महत्वाच्या घडामोडी

आपल्या मुलीच्या लग्नात वडिलांनी केलं असं काही..पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल…

प्रतिनिधी / उत्तर प्रदेश

आपल्या मुलीचं लग्न हा प्रत्येक वडिलांसाठी भावनिक क्षण असतो.. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राहणारे अखिल भारतीय ब्राम्हण महासभेचे राज्य सरचिटणीस आचार्य राजेश शर्मा यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची मिरवणूक एका अनोख्या पद्धतीने काढली आहे..

या मिरवणुकीची शहरातच नव्हे तर सोशल मिडीयावर देखील जोरदार चर्चा होत आहे.. लग्नाच्या दरम्यान नवरीच्या वडिलांनी थेट वरात काढली आणि घोड्यावर बसून लग्नाची मिरवणूक काढली.. श्वेता भारद्वाज असे या नवरीचे नाव आहे..

या मिरवणुकीत श्वेता हिचे संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक सहभागी झाले होते.. घोड्याच्या बग्गीवर बसून संपूर्ण शहरात ही मिरवणूक फिरवण्यात आली आहे.. या मिरवणुकीत मुलींना समान सन्मान देण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न श्वेताचे वडील राजेश शर्मा यांच्याकडून करण्यात आला..

आपण पाहतो की अजूनही काही लोक घरात मुलगी जन्माला आली की तितका जल्लोष किंवा आनंद व्यक्त करत नाहीत.. अशा लोकांना संदेश देण्यासाठी आचार्य राजेश शर्मा यांनी हा नवीन उपक्रम राबवला आहे..

मुलीला ओझं समजू नका, मुलीला समान हक्क द्या असेही वडील राजेश शर्मा यांनी सांगितले आहे.. घोडेस्वारीदरम्यान बग्गीवर स्वार झालेल्या नववधू श्वेता भारद्वाज हिचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..

हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी श्वेता आणि तिचे वडील राजेश शर्मा यांचे खूप कौतुक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *