महत्वाच्या घडामोडी

आश्चर्यकारक ! मुलगा जन्माला आला आणि पाचवीला पुजला ‘ फुटबॉल ‘…

प्रतिनिधी / कोल्हापूर

आपल्याला माहितच असेल की, महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये फुटबॉल प्रेमी खूप आहेत.. फुटबॉलचं कोल्हापूरकरांना जणू वेडंच लागले आहे.. अशीच एक आश्चर्यकारक बातमी कोल्हापुरातून समोर आली आहे..

कोल्हापुरातील आझाद चौक, देवकर पाणंद येथील एका फुटबॉल प्रेमीने आपल्या मुलाच्या पाचवीला चक्क फुटबॉल खेळाचा देखावा साजरा केला आहे.. अजय जगदाळे असे या फुटबॉल प्रेमीचे नाव आहे.. अजय जगदाळे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे..

मुलगा झाल्यानंतर बाळाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी पाचवीची पूजा करण्याची लगबग अजय यांच्या घरी चालू होती.. मात्र बाळाच्या पाचवीच्या पूजेच्या वेळी अजय यांनी पूर्ण फुटबॉलचा देखावाच उभारला आहे..

अजय जगदाळे यांनी या देखाव्यामध्ये फुटबॉल तसेच या खेळातील दिग्गज खेळाडूंचे टी – शर्ट आणि दिग्गज खेळाडूंचे फोटो अशा वस्तूंनी देखावा सजवला आहे.. सध्या या देखाव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *