महत्वाच्या घडामोडी

मुलाच्या अकाली निधनानंतर धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण…

प्रतिनिधी / पुणे

पुणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.. आपल्या मुलाच्या अकाली निधनाच्या धक्क्याने वडिलांनीही आपले प्राण सोडल्याची घटना घडली आहे.. दिलीप सातपुते ( वय – ७१ ) असे या वडिलांचे नाव असून, चिन्मय सातपुते ( वय – ३७ ) असे या मृत झालेल्या मुलाचे नाव आहे..

दिलीप सातपुते हे पुण्यातील नांदेड सिटीतील रहिवासी आहेत.. ते महावितरणमधील कर्मचारी म्हणून निवृत्त झाले आहेत.. त्यांना चिन्मय सातपुते हा एकुलता एक मुलगा होता.. चिन्मय याला वडिलांनी संगणक अभियंता केले होते..

चिन्मय सातपुते हे विमान नगर येथील आयटी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होते.. चिन्मय यांची पत्नी दीपा ही शिक्षिका म्हणून एका शाळेत कार्यरत आहेत.. दिलीप सातपुते हे आपल्या कुटुंबासोबत निवृत्तीचा आनंद घेत होते.. सगळे काही व्यवस्थित चालू होते..

काही दिवसांपूर्वी चिन्मय सातपुते यांचे अल्पशः आजाराने निधन झाले.. घरातील कर्ता – धर्ता मुलगा गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. वडील दिलीप सातपुते हे आपल्या मुलाच्या निधनाचा धक्का सहन करू शकले नाहीत..

चिन्मय याच्या निधनानंतर वडील दिलीप सातपुते यांना आपल्या मुलाचा विरह सहन न झाल्याने त्यांनीही आपले प्राण सोडले आहेत.. सातपुते कुटुंबात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *