महत्वाच्या घडामोडी

मृत वडिलांचे बँक खाते बंद करण्यासाठी गेला, मुलाचं नशीबच पालटलं..पाहा नक्की काय घडलं ?

प्रतिनिधी / मध्यप्रदेश

आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता वाटत असते.. या चिंतेमुळे आपण आपली थोडीफार बचत बँकेत ठेवत असतो.. काही लोक तर बँकेत एफडीही करतात.. आणि त्यांना त्या एफडीवर थोड्या प्रमाणात व्याजही मिळते.. आपण बचत केलेली रक्कम आपल्याला कोणत्याही अडचणी शिवाय मिळावी अशी आपली इच्छा असते.. मात्र तुमच्यासोबत कधी असे झाले आहे का, की तुम्ही वेगळ्या कामासाठी बँकेत गेला आहात आणि बँकेने तुमच्या हातात लाखो रुपये दिले आहेत..

अशीच एक आश्चर्यकारक घटना मध्य प्रदेशातील पाटण जिल्ह्यातील मांडा गावात घडली आहे. या गावात एका शेतकरी कुटुंबात राहणारे कुटुंबप्रमुख जनवेश कुमार यांचे निधन झाले असता त्यांची मुले त्यांच्या नावाचे बँकेत असलेले खाते बंद करण्यासाठी गेले असता चक्क बँकेने त्यांना १५ लाख रुपयांचा चेक मिळणार असल्याचे सांगितले आहे.. हे ऐकून ते शेतकरी कुटुंबदेखील संभ्रमात पडले आहे..

यावेळी बँकेच्या व्यवस्थापकाने त्यांना माहिती दिली की, ही रक्कम त्यांना क्लेम म्हणून दिली जाणार आहे.. जनवेश कुमार यांनी बँकेत १५ लाख रुपयांची KCC विमा पॉलिसी घेतली होती.. हे समजल्यानंतर त्यांची मुले व संपूर्ण कुटुंब थक्क झाले आहे.. जनवेश कुमार हे घराच्या छतावर काम करत असताना घसरले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे खाते बंद करावे असे त्यांच्या कुटुंबियांना वाटले म्हणून ते बँकेत गेले असता त्यांना या पॉलिसीबद्दल समजले.. बँकेतील कर्मचाऱ्यांनी सर्वे कागदपत्रे पूर्ण करून क्लेमची संपूर्ण रक्कम जनवेश कुमार यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केली आहे.. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *