स्पेशल स्टोरीज

आईचं छत्र हरवलेल्या गोल्ड मेडिलिस्ट मुलाने नोकरी सोडून सुरू केला हॉटेल व्यवसाय

नकळत्या वयात आईचं छत्र हरवलं.. मंगळवेढच्या लक्ष्मी दहिवडीचा मुलगा दत्तक म्हणून पंढरपुरच्या रोपळे गावात येतो.. पुण्याच्या सिंहगड कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण करतो आणि पुणे विद्यापीठाचं गोल्ड मेडल मिळवतो.. लागलेल्या नोकरीला लाथ मारून ज्या कॉलेजचा टॉपर होता, त्याच कॉलेजसमोर ‘खा खच्चून’ आणि ‘हरभोले’ ही दोन हॉटेल सुरू करतो.. हे सगळं कसं प्रवाहाच्या विरोधातलं वाटतंय ना..?

हर्षवर्धन पाटील या पंढरपुरच्या पोरानं पुण्यात दोन हॉटेल्स आणि दोन अभ्यासिका सुरू केलेत.. आई गेली तेव्हा त्याला नीटसं कळतही नव्हतं.. आईचा चेहराही आता त्याला आठवत नाही.. मात्र या आणि अशा असंख्य अडचणींवर मात करत त्यानं पुण्यात उभारलेलं जग प्रेरणादायी आहे..

आज ‘इंटरनॅशनल युथ डे’ च्या निमित्तानं त्याच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी समाधान काळे यांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *