महत्वाच्या घडामोडी

मुलासाठी आई झाली हिरकणी , आईची वाघाशी झुंज…

प्रतिनिधी / मध्यप्रदेश

एका आईने आपल्या मुलाला सोडवण्यासाठी चक्क वाघाशी लढा दिला आहे.. मध्य प्रदेशमधील उमरिया जिल्ह्यात बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला लागून एका गावात एक १५ महिन्याच्या मुलासोबत आणि त्याच्या आईसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे..

सकाळपर्यंत गावात सर्वकाही सुरळीत चालू होते.. अचानक सकाळी भोला प्रसाद यांच्या घराच्या मागे लपलेला वाघ त्यांच्या १५ महिन्याच्या बाळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता.. संधी मिळताच वाघाने त्या बाळाला जबड्यात उचलून पळायला सुरवात केली, त्याचवेळी आईने ते पाहिले आणि आपल्या बाळाला वाचवण्यासाठी ती वाघाच्या समोर उभी राहिली..

आईला समोर बघताच वाघाने मुलाला सोडून दिले आणि आईवर हल्ला केला.. अर्चना असे आईचे नाव असून त्यांना वाघाने आपल्या दाताने ओढून त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरु केले.. एवढे सगळे करूनही अर्चना शेवटपर्यंत त्या वाघाशी लढत राहिल्या.. अखेर आईच्या प्रेमासमोर त्या वाघाला हार मानवी लागली, आणि तो जंगलाच्या दिशेने पळत सुटला.. या घटनेत आई आणि मूल दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सामुदायिक आरोग्य केंद्र मानपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. अशापद्धतीने एका धाडसी आईने वाघाशी झुंज करून आपल्या बाळाला सुखरूप वाचवले आहे.. या आईच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *