महत्वाच्या घडामोडी

कुटुंबाने वाढदिवसादिवशीच मोलकरणीला दिले सरप्राईज ! पाहा हा व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

सध्या सोशल मिडीयावर एका वाढदिवसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुटुंब आपल्या मोलकरणीचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत..

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खास दिवस असतो.. आपल्याला वाढदिवसादिवशी आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्या सरप्राईज द्यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.. आणि अनपेक्षितपणे जर एखाद्या व्यक्तीला सरप्राईज मिळाले तर त्याचे डोळे आनंदाने पाणावतात..

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका कुटुंबाने आपल्या मोलकरणीला तिच्या वाढदिवसादिवशी एक सरप्राईज दिल आहे.. या कुटुंबाने मोलकरणीच्या वाढदिवसादिवशी घरातील सदस्या प्रमाणे केक आणून तिचा वाढदिवस साजरा केला आहे..

आपल्याला घरातील सदस्याप्रमाणे प्रेमळ वागणूक दिलेली पाहून त्या मोलकरणीच्या डोळ्यातही पाणी आले आहे.. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी ‘आपल्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकासाठी काहीनाकाही केले पाहिजे’ असे मत व्यक्त केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *