महत्वाच्या घडामोडी

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे ८ महिन्याच्या चिमुकलीचा घात, पाहा नक्की काय घडले…

प्रतिनिधी / बरेली

मोबाईल फोनचा स्फोट झाल्याच्या घटना आजकाल वारंवार समोर येत आहेत.. मोबाईल फोनच्या स्फोटामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो, तर काहीजण गंभीररीत्या जखमीही होतात.. अशीच एक धक्कादायक घटना बरेली येथून समोर आली आहे.. या घटनेमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे एका ८ महिन्याच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे..

बरेली जिल्ह्यातील फारीद्पूर पोलीस स्टेशन हद्दीतील पचुमी गावात राहणारा सुनील कुमार कश्यप हा मजूर म्हणून काम करतो.. सुनील मोबाईल चार्जिंगला लावून कामावर गेला होता.. घरात त्याची पत्नी कुसुम आणि दोन वर्षाची मुलगी नंदिनी आणि ८ महिन्याची मुलगी नेहा या तिघीच होत्या.. कुसुम आपल्या दोन्ही मुलींना वेगवेगळ्या बेडवर झोपवून ती घरातील कामात व्यस्त झाली होती..

सुनील आणि कुसुम यांची ८ महिन्याची मुलगी नेहा ज्या बेडवर झोपली होती तेथे चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला.. आणि बेडला आग लागली, त्या बेडवर झोपलेली ८ महिन्याची नेहा ही गंभीररित्या जखमी झाली होती.. हे घडताच सगळे तेथे धावून आले.. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जखमी अवस्थेत जिल्ह्य रुग्णालयात दाखल केले.. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच त्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.. कुटुंबाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे असे फारीद्पूर पोलीस स्टेशनचे एसएचओ यांनी सांगितले आहे.. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

https://youtu.be/94T-rCPUrHs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *