Uncategorized

मा.आ.दत्तात्रय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी कामगारांना चादर व पाण्याचे जार वाटप,

एबी मराठी न्यूज नेटवर्क

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.. काल सायंकाळी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन देण्यात आले.. तर आज सुधीर शिंदे मित्र मंडळाच्या वतीने ऊसतोडणी कामगारांना चादरी व पाण्याचे जार वाटप करण्यात आले..

माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर रक्तदानाचे आयोजन करण्यात येते.. यावर्षी ऊसतोडणी कामगारांना मदत देऊन सुधीर शिंदे मित्रमंडळाच्या वतीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला..

ऊसतोडणी कामगारांना साहित्याचे वाटप करताना ओझेवाडी येथील शेतकरी हनुमंत तात्या नागणे, सुधीर भाऊ शिंदे, जेष्ठ व्यक्तिमत्व तुकाराम पाटील, विश्वास नागणे सर, बबलू क्षीरसागर सर, युवा उद्योजक महेश यादव, वकील अजय शिंदे, समाधान चव्हाण, रियाज मुलानी, नवनाथ नागणे, सत्यवान खडके, आदी मान्यवर उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *