महत्वाच्या घडामोडी

लाडाने मित्रांना सायकलीवर बसवलं आणि मित्राने केला करेक्ट कार्यक्रम.. पाहा नक्की काय घडलं…

प्रतिनिधी / व्हायरल

तुमच्या लहानपणी तुम्ही मित्रांसोबत अनेक खेळ खेळले असतील.. खेळ खेळताना अनेकवेळा मारही खाल्ला असेल किंवा अनेकांना तुम्ही मारलेही असेल.. असाच एका मित्रांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे..

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या सायकलवर एका मुलाने आपल्या तीन मित्रांना बसवले आहे.. एक मित्र तर चक्क सायकलच्या हँडलवर बसलेला तुम्ही पाहू शकता.. हे चौघेजण मित्र सायकलवर बसून सायकल चालवत असतात..

सायकल चालवत असताना अचानक एक मित्र खाली उडी मारतो आणि त्यानंतर तिघेही उडी मारतात.. मात्र हँडलवर बसलेला मित्र तसाच सायकलवरून पुढे जातो आणि खाली पडतो.. त्यानंतर हे बाकीचे मित्र त्याला पाहून हसू लागतात..

हा व्हायरल झालेला मजेशीर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.. या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मिडीयावर मनोरंजनही होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *