महत्वाच्या घडामोडी

मित्र असावा तर असा ! पाहा या चिमुकल्याने काय केलं…

प्रतिनिधी / व्हायरल

आयुष्यात आईचे प्रेम मिळायला नशिबच लागतं असं म्हणतात आणि ते खर आहे.. काहींना आईच्या प्रेमापासून वंचित राहावं लागतं आयुष्यात आईचे प्रेम सर्वांनाच मिळते असे नाही.. पण काही जणांना आईचे प्रेम हे इतरांकडूनही मिळत असते..

सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.. एक मित्र त्याच्या मित्राला कशा प्रकारे खांदा देतो हे या व्हिडीओत दिसत आहे.. या व्हायरल विडीओमध्ये तीन चार मुले एका रांगेत बसलेले दिसत आहेत..

या रांगेत बसलेल्या मुलांपैकी एका मुलाला झोप लागली आहे.. आणि तो मुलगा डुलकी मारत आहे.. तर त्याच्या शेजारी बसलेल्या मित्राचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि तो त्याच्या मानेला धरून आपल्या खांद्यावर ठेवतो..

डुलकी मारत असलेल्या मित्राचे डोके आपल्या खांद्यावर ठेवल्यानंतर तो मित्र शांतपणे मित्राच्या खांद्यावर झोपी जातो.. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.. आणि तुम्हीही भाऊक झाल्याशिवाय राहणार नाही..

या मुलांचा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे.. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत..

One thought on “मित्र असावा तर असा ! पाहा या चिमुकल्याने काय केलं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *