महत्वाच्या घडामोडी

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं संपवलं आपलं जीवन, पाहा नक्की काय घडलं…

प्रतिनिधी / बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात देऊळगाव माळी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे.. हुंड्यासाठी होणारा शारीरिक आणि मानसिक छळ तसेच सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.. राधिका पवन खेत्री ( वय – २२ ) असं या विवाहितेचे नाव आहे..

राधिकाचा विवाह झाल्यापासून तिचा पती व सासरकडची मंडळी राधिकाला सतत माहेरवरून पैसे आण अशी मागणी करत होते.. आठ महिन्यांपूर्वी राधिकाला एक मुलगीही झाली होती.. आपल्या मुलीला म्हणजेच राधिकाला होणारा त्रास बघून तिच्या माहेरकडच्या मंडळींनी राधिकाच्या सासरकडच्या मंडळींसोबत दोन वेळेस बैठक घेऊन काही पैसेही दिले होते.. मात्र तरीसुद्धा सासरकडून राधिकाचा छळ सुरुचं होता.. राधिकाच्या पतीचाही यामध्ये समावेश होता.. सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राधिकाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.. दरम्यान राधिकाच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी राधिकाच्या पतीसह पाच जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *