महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! साई चरणी नतमस्तक होताच घडले असे काही…

प्रतिनिधी / मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमधून कटनी एक दुखःद घटना समोर येत आहे.. येथे साईच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाचा मृत्यू झाला आहे.. राकेश ( वय – ४२ ) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे..

राकेश हे मध्य प्रदेशातील कटनी येथे साई मंदिरात दर्शनासाठी आले होते.. दर्शन घेण्यासाठी राकेश नतमस्तक झाले आणि त्यांनी तिथेच जीव सोडला.. बराच वेळ राकेश खाली वाकून राहिल्यामुळे मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांना आवाज दिला..

मात्र राकेश यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.. त्यामुळे नीट पाहिले असता राकेश यांचा मृत्यू झाल्याचे समजले.. मंदिरात उपस्थित असलेल्या व्यक्तींनी तात्काळ राकेश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले..

रुग्णालयात नेले असता हृदयविकाराच्या झटक्याने राकेश यांचे निधन झाले आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.. ही धक्कादायक घटना मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *