महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! अपघातात मामा आणि भाच्याचा होरपळून दुर्दैवी अंत…

प्रतिनिधी / अहमदनगर

नाशिक येथील शिंदे – पळसे गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात अकोले तालुक्यातील दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. या भीषण अपघातात अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील रहिवासी असलेले मामा आणि भाचे यांचा जागीच मृत्यू झाला आहे..

मदन साबळे ( मामा ) आणि रवींद्र विसे ( भाचा ) अशी या मृत झालेल्या मामा भाच्यांची नावे आहेत.. पुणे – राजगुरूनगर डेपोतून नाशिकच्या दिशेने एक एसटी बस निघाली होती.. नाशिक शहराच्या वेशीवर आल्यानंतर बसचे ब्रेक फेल होऊन बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले..

त्यानंतर या बसने स्टाॅपवर थांबलेल्या दुसऱ्या बसला पाठीमागून जाऊन धडक दिली.. या दोन्ही गाड्यांच्या मध्ये एक बाईक चिरडली गेली आणि बाईकवर असलेले दोघेजण बसच्या चाकाखाली अडकले.. ही धडक इतकी भीषण होती की स्पार्किंग होऊन आग लागली..

या आगीत बसच्या चाकाखाली अडकलेले मदन साबळे आणि रवींद्र विसे या मामा भाच्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.. या आगीमध्ये दुचाकीही जळून खाक झाली आहे.. या दुर्घटनेत दोघांचा जीव गेला असून ४३ जण थोडक्यात बचावले आहेत तर २७ जण जखमी झाले आहेत..

या अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी एसटी बसमधील प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.. मात्र एसटी बसही जळून खाक झाली आहे.. या भीषण अपघातात मदन साबळे आणि रवींद्र विसे या मामा भाच्याचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे अकोले जिल्ह्यावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *