महत्वाच्या घडामोडी

मास्क आणि काळा चष्मा घालून महिला आली ज्वेलरी शॉपमध्ये ! पुढे पाहा काय झाले…

प्रतिनिधी / उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथील एका दागिन्यांच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या एका महिलेने चक्क १० लाख किमतीचा सोन्याचा नेकलेस चोरून नेल्याची घटना समोर आली आहे..

कॅंट परिसरातील बलदेव प्लाझा येथील बेचू लाल सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या शोरूममध्ये ही घटना घडली आहे.. या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात या महिलेचा चोरी करतानाचा व्हिडीओ कैद झाला आहे.. त्यानंतर दुकान मालक गौरव सराफ यांनी नेकलेस चोरी प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे..

शोरूममध्ये दागिन्यांची खरेदी करण्यासाठी खूप गर्दी झाली होती.. अनेक महिला शोरूममध्ये आल्या होत्या.. त्याचवेळी हिरव्या साडीत एक ४५ वर्षीय महिलाही आली होती.. या महिलेने चेहऱ्यावर मास्क आणि काळा चष्माही लावला होता..

शोरूममधील कर्मचाऱ्यांनी या महिलेला नेकलेस सेट दाखवायला सुरवात केली.. महिलेच्या समोर दोन बॉक्स ठेवले.. लगेच या महिलेने दोन बॉक्स उचलून आपल्या मांडीवर ठेवले.. काही वेळ पाहिल्यानंतर आता मला दागिने आवडत नाहीत असे म्हणून ती तिथून निघून गेली..

काही वेळानंतर दागिन्यांचा एक सेट कमी आहे असे आढळून आले.. सुरवातीला शोरूमच्या मालकाला कर्मचाऱ्यावर संशय येऊ लागला.. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.. शोरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात या महिलेचे संपूर्ण कृत्य कैद झाले होते..

या महिलेने चोरी केलेल्या नेकलेसची किंमत १० लाख रुपये आहे असे सांगण्यात आले आहे.. पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *