महत्वाच्या घडामोडी

महिला पोलिसाचा मृत्यू , दहा दिवसाचं बाळ झालं पोरकं…

प्रतिनिधी / बारामती

बारामतीमध्ये शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.. शीतल जगताप गलांडे असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.. शीतल यांनी प्रसूतीसाठी रजा घेतली होती.. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच त्यांनी एका बालकाला जन्म दिला आहे..

मात्र, प्रसुतीनंतर शीतल यांना डेंग्यूची लागण झाली होती.. शीतल यांना पुणे शहरातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.. परंतु, उपचारादरम्यान शीतल यांचा मृत्यू झाला आहे.. आणि अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेलं बाळ पोरकं झालं आहे.. प्रसुतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत शीतल पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या.. पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये शीतल यांचा सिंहाचा वाटा होता.. शीतल यांच्या पश्चात पती, एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेलं बालक असा परिवार आहे.. या घटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *