महत्वाच्या घडामोडी

लग्न मांडवात नवऱ्याचा चेहरा पाहून भडकली नवरी.. पाहा नक्की काय झाले…

प्रतिनिधी / व्हायरल

प्रत्येक मुलींच्या आयुष्यात लग्न हे सर्वात सुंदर स्वप्न असत.. तर दुसरीकडे अशाही मुली आहेत की लग्न हे त्यांच्या आयुष्यातील शिक्षाच आहे.. अनेक ठिकाणी आई – वडील गरिबीमुळे हतबल असतात.. ते हुंडा देऊ शकत नाहीत..

अशा विचाराने कित्येक पालक आपली मुलगी कोणाच्याही हातात सोपवतात.. एकदा का मुलीचं लग्न केलं की डोक्यावरच ओझं उतरल असे त्यांना वाटते.. तर काहीजण बळजबरीने मुलीचे लग्न करतात..

सध्या सोशल मिडीयावर असाच एक लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. या विडीओमध्ये लानाच्या मंचावर वृद्ध नवरा पाहून नवरीला राग आला आणि तिने नवऱ्यासह कुटुंबातील सदस्यांना व समाजाला चांगलच सुनावलं आहे..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की लग्नाच्या स्टेजवर नवरा बसलेला आहे आणि त्याच्या शेजारी लाल साडीत नवरी बसली आहे.. परंतु स्टेजवर वृद्ध नवऱ्याला पाहून नवरी भडकली आणि तिने लग्नाला स्पष्ट नकार दिला आहे..

नातेवाईकांनी तिला समजून सांगितले की काय झाले, तू लग्न कर परंतु ती लग्न करायला तयार नव्हती.. नवरी म्हणाली की, मी याच्याशी लग्न करून काय करू, हा काही वर्षांनी निघून जाईल मग माझं आयुष्य उध्वस्त का करू? आणि ती आपल्या मतावर ठाम राहिली.. आणि तिने गळ्यातील हार काढून तिथून निघून गेली..

हा व्हायरल होणारा व्हिडीओ गरिबी आणि मजबुरीत होणाऱ्या विवाहाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी बनवण्यात आला आहे.. या व्हिडीओला अनेकांनी लाईक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *