महत्वाच्या घडामोडी

आश्चर्यकारक ! मच्छिमार करणार कुटुंब झालं फटक्यात लखपती…

प्रतिनिधी / केरळ

नशिबाच्या सोंगट्या कशा आणि कधी पलटतील हे कोणालाच सांगता येणार नाही.. ज्यावेळी अंधारात कुढत असलेल्या जीवांना चमत्काराचा परिणाम पाहायला मिळतो, तेव्हा नशीब पालटते, चमकते आणि चकाकतेही असे आपण म्हणतो.. अशीच एक बातमी केरळमधून समोर येत आहे.. येथे एका मच्छिमाराच्या नशिबाने अचानक कूस बदलली आहे.. त्याला चमत्काराशिवाय दुसरा शब्द नाही..

अवघ्या दीड तासात या मच्छिमाराच्या नशिबाचे फासे पालटले असून त्याच्या दुःखाला हास्याची किनार लाभली आहे.. कोल्लम येथील पुकुंजू ( वय – ४० ) हे मच्छिमार आहेत.. त्यांनी कोर्पोरेशन बँकेकडून गृहकर्ज घेतले होते.. या कर्जाच्या हप्त्याची रक्कम भरण्यासाठी त्यांची खूप ओढाताण होत होती..

पुकुंजू या मच्छिमाराने ७.४५ लाखांचे कर्ज घेतले होते.. त्याची परतफेड न झाल्याने त्यांच्यावर व्याजासहित १२ लाख रुपयांची थकबाकी होती.. या थकबाकीमुळे बँकेने त्यांची मालमत्ता म्हणून घराच्या जप्तीची प्रक्रिया सुरु केली होती.. त्यासंबंधीची नोटीसही बँकेने त्यांना पाठवली होती.. पुंकुजू यांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावल जात असल्यामुळे ते खूप खचून गेले होते..

आता पुढे काय करायचे या विचारात पुंकुजू असताना अचानक त्यांना भावाचा फोन आला, आणि पुंकुजू यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.. अवघ्या दीड तासातच त्यांच्या सर्व चिंता एका फटक्यात दूर झाल्या होत्या.. कारण अक्षय लॉटरी योजनेतून तब्बल ७० लाखांची लॉटरी पुंकुजू यांना लागली होती.. हे लॉटरीचे तिकीट पुंकुजू यांच्या वडिलांनी घेतले होते.. त्यांच्या वडिलांना लॉटरीचे तिकीट घेण्याची सवय होती.. अवघ्या काही तासातच पुंकुजू यांच्या नशिबाचे फासे पालटले होते त्यामुळे पुंकुजू यांच्या आनंदही गगनात मावत नव्हता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *