महत्वाच्या घडामोडी

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या ! अंगणात खेळत असणाऱ्या दीड वर्षाच्या मुलीसोबत घडलं असं काही…

प्रतिनिधी / भंडारा

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज येथे एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.. येथे एका अंगणात खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे..

सान्वी छत्रपाल कुथे असे या मृत बालिकेचे नाव आहे.. सान्वी घराशेजारी मुलांसोबत खेळत होती.. आपली मुलगी बाहेर खेळत असल्याने आई घरकामात व्यस्त होती.. घरातील काम आटोपल्यानंतर आईने बाहेर जाऊन बघितले तर सान्वी अंगणात दिसली नाही..

त्यानंतर आईने आजूबाजूला सान्वीचा शोध घ्यायला सुरवात केली.. दरम्यान शेजाऱ्यांच्या घराच्या अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीत सान्वी पडलेली दिसली.. सान्वी हिला तात्काळ पाण्याबाहेर काढून सरांडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर लाखांदूर येथे ग्रामीण रुग्णालयात नेले..

परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी सान्वीला मृत घोषित केले.. सान्वीच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *