महत्वाच्या घडामोडी

वाढदिवसादिवशीच चिमुकलीला मृत्युने गाठले…

प्रतिनिधी / कोट्ट्यायम

कतारच्या वाक्रा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.. शाळेच्या बसचा चालक बस लॉक करून निघून गेला, बस एसी असल्यामुळे सर्व काचा बंद होत्या, आणि अशातच श्वास कोंडला गेल्याने एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. मिन्सा ( वय – ४ ) असं या चिमुकलीचं नाव आहे..

जुनियर केजी मध्ये शिकत असलेली मिन्सा रविवारी सकाळी बसने शाळेत जाण्यासाठी निघाली.. आणि बसमध्ये तिला झोप लागली.. बस शाळेच्या आवारात पोहोचल्यावर सर्व विद्यार्थी खाली उतरले.. बसचे चालक आणि वाहक यांचे मिन्साकडे लक्ष्य गेले नाही, आणि नेहमीप्रमाणे त्यांनी बस बंद केली आणि ते निघून गेले..

शाळा सुटल्यानंतर काही तासांनी विध्यार्थ्यांना बसने घरी सोडण्यासाठी चालक आणि वाहक दोघेही बसकडे परतले.. आणि त्यांनी दार उघडताच त्यांना मिन्सा दिसली.. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु खूप उशीर झाल्याने तिची प्राणज्योत मालवली होती.. बसमधून सर्व विद्यार्थी उतरले असता बस चालकाने एसी बंद केल्यामुळे मिन्साचा श्वास कोंडला आणि तडफडून तिचा मृत्यू झाला.. रविवारी मिन्साचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी तिला मृत्युनं गाठलं, त्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही शोककळा पसरली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *