महत्वाच्या घडामोडी

गणपती विसर्जनादिवशी एका लहान मुलाचा मृत्यू…

प्रतिनिधी / निवाडी

निवाडी तालुक्यातील ओरछा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वाहनाखाली आल्याने एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. हर्ष जोशी (वय – ८ ) असं या मृत झालेल्या मुलाचं नाव आहे.. गुरुवारी बाप्पांच विसर्जन करण्यात आलं.. त्यावेळी बाप्पांच्या मिरवणुकीत डीजे लावण्यात आला होता.. एकून तीन गाड्यांवर डीजे लावण्यात आला होता.. या डीजेवर लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर तरुणाई थिरकत होती..

यावेळी हर्ष हा डीजे लावण्यात आलेल्या वाहनाच्या चाकाखाली आला.. चाकाखाली सापडताच हर्षने आरडाओरडा केला, मात्र गाण्याचा आवाज इतका जास्त होता की त्याचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही.. वाहन हर्षच्या अंगावरून गेल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हर्षला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलं आणि त्याला लगेचच आरोग्य केंद्रात नेण्यात आले.. त्यानंतर त्याला झाशीला नेण्यास सांगितले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.. पोलिसांनी डीजे लावण्यात आलेलं वाहन जप्त केले आहे.. हर्षच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *