महत्वाच्या घडामोडी

लेकीला कॉलेजला सोडायला जाताना वडिलांना अश्रू अनावर, पाहा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

सध्या सोशल मिडीयावर मुलगी आणि वडील यांच्या अतूट नात्याचा एक भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आपल्या मुलीला कॉलेजमध्ये सोडताना या वडिलांच्या डोळ्यात नकळत अश्रू आले आहेत..

हा भावनिक व्हिडीओ प्रेक्षा मोहिल यांनी आपल्या इंस्टाग्राम  पेजवर पोस्ट केला आहे.. प्रेक्षा हिने लिहिलंय की, दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेज येथे मला माझे वडील सोडायला आले होते.. तो माझा पहिलाच दिवस होता..

कॉलेजचा पाहिला दिवस असल्यामुळे आम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरत होतो.. आणि त्यावेळी मला कळाले की माझ्या वडिलांच्या डोळ्यात नकळत अश्रू येत आहेत.. ते भावनिक झाले होते.. त्यांची लेक त्यांच्यापासून आता वेगळी राहणार होती म्हणून कदाचित माझ्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते..

बापाच्या डोळ्यातील अश्रू जणू मला सांगत होते की, मी केलेले परिश्रम, केलेले त्याग हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वकाही सार्थकी लागलं आहे.. “पप्पा आणि मम्मी तुमचे हसरे चेहरे पाहण्यासाठी मी काहीही करू शकते एवढेच सांगेन ” असेही प्रेक्षा मोहिल यांनी लिहिलं आहे.. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकजण भावनिक झाले आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *