महत्वाच्या घडामोडी

लिफ्ट मध्ये अडकली शिक्षिका, पुढे झालं असं काही…

प्रतिनिधी / मुंबई

मुंबई शहरातील मालाड या उपनगरात एक दुर्दैवी घटना घडली आहे.. येथे एका खाजगी शाळेतील शिक्षिकेसोबत एक जीवघेणा प्रकार घडला आहे.. जेनेल फर्नांडिस असे या शिक्षिकेचे नाव आहे..

जेनेल फर्नांडिस या एका खाजगी शाळेत नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या.. जेनेल या आपला दुपारचा तास संपवून सहाव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर स्टाफ रूममध्ये जात होत्या.. यावेळी त्यांनी लिफ्टचा वापर केला..

जेनेल यांनी लिफ्टमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या दरवाज्यात अडकल्या आणि लिफ्ट खालच्या दिशेने जाऊ लागली.. अचानक लिफ्टची यंत्रणा बिघडल्याने ही घटना घडली आहे.. या घटनेमुळे तेथून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अचानक लिफ्ट बंद करून या शिक्षिकेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा पाय पूर्णपणे मोडला होता आणि त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला होता..

या घटनेनंतर जेनेल यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.. मात्र उपचार सुरु असतानाच जेनेल यांचा काही वेळातच मृत्यू झाला आहे.. या घटनेने शाळेत शोककळा पसरली असून जेनेल यांच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *