महत्वाच्या घडामोडी

लग्नात नाचताना उत्साहात बायकोला उचलायला गेला अन घडलं असं काही…

प्रतिनिधी / व्हायरल

सध्या सोशल मिडीयावर नवरा – नवरीचा लग्नात नाचत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. लग्न मुलाकडचे असो किंवा मुलीकडचे लग्न समारंभ म्हणल की सगळेच आनंदाने नाचतात.. अगदी नवरा – नवरीसुध्या आपल्या लग्नात नाचताना दिसतात..

लग्नात ज्या लोकांना अजिबात नाचता येत नाही असेही काहीजण सगळ्यांसोबत ठेका धरताना दिसून येतात.. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असं काही घडलय की ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही..

या व्हिडीओमध्ये एक जोडपे डान्स फ्लोअरवर नाचत असतात.. त्याचवेळी एक व्यक्ती रोमँटिक मूडमध्ये येऊन आपल्या पत्नीला उचलून नाचण्याचा प्रयत्न करतो.. पण त्याचा हा प्रयत्न फसतो आणि पत्नीला उचलताना काही कळायच्या आतच त्याचा तोल जातो आणि तो खाली दणकन आदळतो..

नाचत असताना एक व्यक्ती खाली आदळल्याने तेथे उपस्थित असलेले सर्वच लोक हे दृश पाहून हसायला लागतात.. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून लोक या जोडप्याच्या डान्सवर खूप कमेंट्स करत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *