महत्वाच्या घडामोडी

भयंकर ! लग्न सोहळ्यात वरात निघण्याआधीच गॅस सिलींडरचा भीषण स्फोट…

प्रतिनिधी / राजस्थान

राजस्थान येथील जोधपूरमध्ये आग लागून मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.. एका लग्न समारंभात वरात निघण्याआधीच गॅस सिलींडरचा भीषण स्फोट होऊन यांचे ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६० पेक्षा अधिक लोक गंभीररित्या भाजले आहेत..

या लग्न सोहळ्यात जखमी झालेल्या सर्व लोकांना उपचारासाठी जोधपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. या जखमींपैकी काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.. याबाबत माहिती अशी की, भूंगराचे रहिवासी सगत सिंह गोगादेव यांच्या मुलाचे काल लग्न होते..

घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. त्यामुळे घरात पाहुणेमंडळीही होते.. या लग्न सोहळ्यासाठी नातेवाईकांसाठी खास मेजवानीचे आयोजनही करण्यात आले होते.. लग्न समारंभ सुरु असताना लग्न मंडपात सगळी पाहुणेमंडळी बसली होती..

यावेळी लग्नाच्या जेवणासाठी लावलेल्या सिलींडरचा अचानक स्फोट झाला.. तिथे असलेले ऐकून पाच सिलींडरचा स्फोट झाला.. सिलींडरच्या स्फोटामुळे घराचे छत देखील कोसळले आणि घटनास्थळी मोठा गोंधळ झाला.. मंडपात असलेले लोक आगीत होरपळले..

या दुर्घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.. यात दोन मुलांचा समावेश आहे.. तर काही लोक गंभीररित्या होरपळले आहेत.. या दुर्घटनेत ६० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.. त्यामध्ये लहान मुले आणि महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे..

जखमी झालेल्या लोकांमध्ये नवरदेव आणि त्यांच्या वडिलांचाही समावेश आहे.. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.. या आगीची माहिती मिळताच अग्नीशामक दल सुद्धा तातडीने घटनास्थळी दाखल झाले..

या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. या दुर्दैवी घटनेने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.. अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *