महत्वाच्या घडामोडी

कौतुकास्पद ! सायकल रिपेअरिंग करणाऱ्या वडिलांच्या मुलीची नासा प्रकल्पामध्ये झाली निवड…

प्रतिनिधी / छत्तीसगड

छत्तीसगड येथील एका सायकल दुरुस्त करणाऱ्याच्या मुलीची नासाच्या नागरिक विज्ञान प्रकल्प मोहिमेसाठी निवड झाली आहे.. रितिका ध्रुव असे या मुलीचे नाव असून रीतिकाचे वडील हे सिरपूरमध्ये सायकल दुरुस्तीचे छोटेसे दुकान चालवतात.. रितिका ही स्वामी आत्मानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, नयापारा येथे इयत्ता ११ विची विद्यार्थीनी आहे.. हा प्रकल्प नासा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय अन्वेषण सहकार्य कार्यक्रमात इस्रोसोबतच्या भागीदारीचा एक भाग आहे.. हा प्रकल्प लघुग्रहांचा शोध घेतो..

या प्रकल्पासाठी देशभरातील ऐकून सहा शालेय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.. त्यामध्ये सिरपूर या पुरातत्व विभागातील रहिवासी असलेल्या रितिका ध्रुव हिची निवड करण्यात आली आहे.. या निवड प्रक्रीयेपूर्वी रितिकाने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि तिथे तिची कामगिरी सर्वोत्तम होती.. सिरपूर या पुरातत्व शहरात राहणाऱ्या रितिकाला दररोज ४३ किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या महासमुंद येथील स्वामी आत्मानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जावे लागते..

रितिका ही अतिशय सामान्य कुटुंबातील मुलगी आहे.. रीतिकाच्या इस्त्रोचा प्रवास तिच्या मेहनती आणि अभ्यासातील आवड यामुळे साध्य झाला आहे.. रितिका तिच्या यशाचे श्रेय तिचे शिक्षक आणि पालकांना देते.. प्रत्येकवेळी माझे शिक्षक आणि माझे कुटुंब माझ्या पाठीशी उभे होते, मला त्यांचे आभार मानायचे आहेत असेही रितिकाने म्हटले आहे.. यापुढेही मी माझा अभ्यास असाच सुरु ठेवणार असंही ती म्हणाली.. तिच्या या कार्यामुळे रितिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *