महत्वाच्या घडामोडी

या काकांचं प्रेम पाहून तुम्हालाही नवल वाटेल…

प्रतिनिधी / व्हायरल

सोशल मिडीयावर सध्या एका जोडप्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.. या व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रेनमध्ये बसलेली एक व्यक्ती आपल्या पत्नीच्या पायाच्या बोटांना नेलपॉलिश लावताना दिसत आहे.. खरतर नवरा – बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ आजपर्यंत तुम्ही सोशल मिडीयावर पाहिले असतील, परंतु नवरा – बायकोमध्ये असे प्रेम तुम्ही क्वचितच पाहिले असेल..

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत हे जोडप एका ट्रेनच्या एसी बोगीमध्ये बसले आहेत.. आणि पती प्रेमाने आपल्या पत्नीच्या पायांच्या बोटाला नेलपॉलिश लावताना दिसत आहे.. या पती – पत्नीकडे पाहून त्यांचे वय ४० ते ५० च्या दरम्यान असेल असा अंदाज आपण बांधू शकतो..

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी या पती – पत्नीच्या जोडप्याला क्यूट म्हणत त्यांच्या प्रेमाचे कौतुक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *