महत्वाच्या घडामोडी

दुर्दैवी ! काका – पुतणे बाईकवरून जात असताना अपघात.. पुतण्यावर काळाचा घाला…

प्रतिनिधी / जळगाव

जळगाव – शिरसोली रोडवर एक भीषण अपघात झाला आहे.. येथे एका मालवाहू छोट्या हत्तीने एका दुचाकीला जोरात धडक दिली आहे.. या धडकेत दुचाकीवर असणारे काका – पुतणे हे वाहनासह दूर फेकले गेले.. यात दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे..

अमीन शेख ( वय – २५ ) आणि शरीफ शेख हा दीड वर्षाचा चिमुकला आहे.. अमीन शेख यांना काही दिवसांपूर्वी मुलगी झाली होती.. त्यामुळे ते आपल्या मुलीला आणि पत्नीला भेटण्यासाठी दुचाकीवरून शिरसोलीला जात होते..

अमीन यांचा पुतण्या शरीफ शेख यालाही फिरवून आणू असा विचार करून ते दोघे काका – पुतणे दुचाकीने शिरसोलीला निघाले.. अमीन शेख हे जळगाव येथील फातिमानगर येथील रहिवासी आहेत.. पत्नीला आणि मुलीला भेटून अमीन आपल्या घराकडे परतत होते..

शिरसोली गावातून निघाल्यानंतर थोड्याच अंतरावर एचपी पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव मालवाहू छोटा हत्तीने अमीन यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.. ही धडक इतकी जबर होती की या धडकेत अमीन हे वाहनासह फेकले गेले तर शरीफ हा चिमुकला चेंडूसारखा हवेत उडून डोक्यावर पडला..

या दुर्घटनेत काका अमीन हे गंभीर जखमी झाले आहेत तर दीड वर्षाचा पुतण्या शरीफ याचा जागीच मृत्यू झाला आहे.. जखमी अमीन यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात करण्यात आली आहे..

या घटनेने अमीन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *