क्राईम

धक्कादायक ! जेवणात केस निघाल्याने पतीने केलं असं काही…

प्रतिनिधी / उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. येथे एका व्यक्तीने जेवणात केस निघाला म्हणून आपल्या पत्नीसोबत एवढे घाणेरडे कृत्य केले आहे की वाचून तुम्हालाही धक्का बसेल.. आणि या घाणेरड्या कृत्यात त्याच्या घरचे लोक देखील त्याला मदत करत होते..

एका ३० वर्षीय महिलेचा पती जेवण करत असताना जेवणात केस निघाल्याने प्रचंड रागाला गेला.. आणि त्याने पत्नीला शिवीगाळी करण्यास सुरवात केली.. इतकेच नाही तर पतीने आपल्या पत्नीचे हात पाय बांधून तिच्या तोंडात बोळा कोंबला आणि तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला..

परंतु पत्नीने विरोध केल्याने पतीने तिच्या डोक्याचे केस कापत तिचे टक्कल केले आहे.. लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार सुरु असताना तिथे पिडीत महिलेची सासू आणि दीर बघत उभे होते आणि महिलेच्या पतीला प्रोत्साहन देत होते..

त्यानंतर पिडीत महिलेने आपल्या माहेरी फोन करून हा सगळा प्रकार सांगितला.. माहेरची लोक लगेच तिच्या घरी पोहोचली.. परंतु पतीने त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला.. त्यानंतर या पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली..

या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.. तसेच आरोपी पतीला अटक देखील करण्यात आली आहे.. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *