महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! जेष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे निधन.. पाहा काय घडलं…

प्रतिनिधी / पंढरपूर

पंढरपूर जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे एक फोर्च्युनर कार ५० फूट खोल कालव्यात कोसळल्याने जेष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला आहे.. तर या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत..

रात्री मोडनिंबकडून पंढरपूरकडे येताना हा भीषण अपघात झाला आहे.. रात्रीच्या वेळेस रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असतना चालकाचे नियंत्रन सुटल्याने कार खोल कालव्यात पडून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे..

ज्या कालव्यात गाडी कोसळली होती त्या कालव्यात उतरायला अडचण येत असल्याने बचाव कार्य करण्यात अडथळे निर्माण होत होते.. त्यामुळे स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..

या भीषण अपघातात जेष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांची कन्या, नात आणि चालक हे गंभीर जखमी झाले आहेत.. या घाटेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *