महत्वाच्या घडामोडी

जपानमध्ये शाळेत मुलांना असे शिकवतात शिष्टाचार…

प्रतिनिधी / व्हायरल

आपण पाहतो ली आपलं मूल शाळेत जाते आणि चांगला अभ्यास करते म्हणजे ते हुशार आहे असे आपण समजतो.. परंतु अभ्यास आला म्हणजेच आपण शिकलो असे नाही तर अभ्यासाबरोबरच आपल्याला व्यवहारात कसे वागायचे कसे बोलायचे याचेही ज्ञान असायला हवे..

या सगळ्याचा विचार करूनच शाळांमध्ये मुल्यशिक्षणाचा वेगळा तास घेतला जातो.. मात्र या तासाकडे आपण गांभीर्याने पाहत नाही.. इतर देशात मात्र मुलांना सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे याबाबतचेही शिक्षण दिले जाते..

सध्या सोशल मिडीयावर जपानमधील एका शाळेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. या शाळेत सार्वजनिक वाहतुकीबाबतचा शिष्टाचाराचा महत्वाचा धडा नाट्य रुपात मुलांना दिला जात आहे.. या व्हिडीओमध्ये ३ ते ४ वर्षांच्या काही मुलांना बसमध्ये बसतो त्याप्रमाणे खुर्च्यांवर बसवण्यात आले आहे..

त्यानंतर एका बाजूने एक वयस्कर आजोबा येतात तेव्हा एक मुलगा उठतो आणि त्यांना बसायला जागा देतो.. त्यानंतर एक गर्भवती महिला आणि एक लहान मूल घेतलेली महिला येते त्यानांही आधीपासून सीटवर बसलेली मुले बसायला जागा देतात.. आणि स्वतः उभे राहतात..

हा व्हायरल व्हिडीओमध्ये जपानमध्ये मुलांना कशाप्रकारे शिष्टाचाराचे धडे दिले जातात हे आपण पाहू शकतो.. या व्हिडीओला अनेकांनी लाईक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *