महत्वाच्या घडामोडी

आश्चर्यकारक ! इथे वाहते चक्क रक्ताची नदी.. पाहा हा व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

आपल्याकडे भारतात अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्यांच्याबद्दल आपल्याला फारस माहित नसतं किंवा आपण त्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही.. परंतु आपल्या भारतात पेरू येथे वाहणाऱ्या लाल नदीबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल..

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या नद्या वाहताना तुम्ही पाहिल्या असतील.. त्यामध्ये हिरवी, निळी, सफेद अशा रंगाच्या नद्या दिसून येतात.. परंतु अशी नदी जी लाल रंगाची दिसते त्यामुळे त्या नदीला ‘लाल रंगाची’ नदी किंवा ‘ब्लडी रिव्हर’ असे देखील म्हणतात..

या लाल रंगाच्या नदीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.. या व्हायरल व्हिडीओत दक्षिण अमेरिका खंडातील एका खोऱ्यातून ही नदी वाहताना दिसत आहे..

या रक्ताच्या नदीला चेरी किंवा विटांसारखे लाल पाणी वाहताना दिसत आहे.. या नदीला येथील स्थानिक भाषेत पुकामायु म्हणून ओळखले जाते.. ‘पुका’ म्हणजे लाल आणि ‘मायु’ म्हणजे नदी असा याचा अर्थ आहे.. मातीच्या विविध थरांमध्ये असलेल्या खनिज घटकांमुळे नदीचे पाणी लाल आहे, हा रंग लोह ऑक्साईडच्या उपस्थितीमुळे आहे.. असे मत येथील स्थानिक लोकांचे आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *