राजकारण,निवडणूक

आज तिसऱ्या दिवशीही अभिजित पाटील यांची चौकशी सुरूच…

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. आज तब्बल ५० तासानंतरही अभिजित पाटील यांची चौकशी सुरुचं आहे.

             या चौकशीतून नेमक काय साध्य होणार अशी चर्चा संपूर्ण राज्यात सुरु असताना अभिजित पाटील यांच्याकडून ४० ते ४५ तोळे सोनं आणि ८० लाखांची रोकड जप्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे…  

            अभिजीत पाटील हे पंढरपूर तालुक्यात झपाट्याने प्रसिद्ध झालेलं नाव असल्यामुळे आणि अवघ्या काही वर्षात त्यांनी राजकीय पटलावर स्वतःच निर्माण केलेलं अस्तित्व यामुळे ते आयकर विभागाच्या रडारवर आले असल्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. मात्र, आज अभिजित पाटील यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं सोन आणि रोख मुद्दल त्यामुळे पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

       चौकशी अजून संपलेली नाही. ही चौकशी किती तास चालेल हे सांगता येत नाही. पुढील चौकशीतून काय साध्य होईल हे मात्र येणाऱ्या काळातच समजणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *