शेतकरी

लग्नमांडवात नवरा-नवरीने केली चक्क ट्रॅक्टरमधून एन्ट्री…

प्रतिनिधी / पंढरपूर

सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे.. नवरा नवरी लग्न मांडवात कशाने एन्ट्री करतील याचा काही नेम नसतो.. एन्ट्रीसाठी काहीजण मोठ-मोठे रथ वापरतात, तर काहीजण महागड्या गाड्यांमधून लग्न मांडवात एन्ट्री करतात, हेलिकॉप्टरमधूनही एन्ट्री घेतलेले अनेक व्हिडीओ आपण याआधी पाहिलेले आहेत..

मात्र आंबे ता. पंढरपूर येथील वधू प्रणाली आणि धोंडेवाडी ता. पंढरपूर येथील वर गणेश यांनी आपल्या लग्नात चक्क ट्रॅक्टरमधूनच एन्ट्री घेतली आहे, त्यामुळे या लग्नात सर्वत्र याचीच चर्चा होती..

गणेश आणि प्रणाली यांचा शुभविवाह सोहळा आज दुपारी वाखरी येथे संपन्न झाला. यावेळी नवरदेव गणेश हा ट्रॅक्टर मधुन पारण्याला गेला तर नवरी प्रणालीही ट्रॅक्टर मधूनच आल्याने या लग्नाला आलेल्या सर्व पाहुणे मंडळी व मित्र मंडळींच्या नजरा या दोघांकडे खिळल्या होत्या..

आपण कितीही आधुनिक झालो तरी आपली शेतीशी असलेली नाळ आपण तोडता कामा नये, हा संदेशच जणू या नवदांपत्याने दिला आहे.. त्यांचं सर्वत्र कौतुक होत असून या अनोख्या एन्ट्रीची सध्या सर्वत्र चर्चा आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *