महत्वाच्या घडामोडी

पत्नीला वाचवण्यासाठी पतीने केलं असं काही.. पाहा काय घडलं…

प्रतिनिधी / जुन्नर

जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कुकडेश्वर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे.. येथे एका पत्नीला वाचवण्यासाठी पती गेला असता दोघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे.. या पती – पत्नीचा सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते..

सागर बाळू दिवटे व नाजूका सागर दिवटे असे या मृत झालेल्या पती – पत्नीचे नाव आहे.. नाजूका ही नवविवाहित महिला कुकडेश्वर येथे घराजवळील विहिरीवर घरातील अंथरून व कपडे धुण्यासाठी गेली होती..

नाजूका ही नेहमीप्रमाणे कपडे धुवत असताना विहिरीच्या कडेवर पाण्याने ओलसर भाग झाल्याने तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली.. विहिरीत पडल्यावर नाजुका हिने आरडओरडा केली..

पत्नी नाजुका हिचा आवाज ऐकून पती सागर धावत आला आणि त्याने पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली.. मात्र पोहण्याचा सराव नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे..

विहिरीच्या काठावर गाणे सुरु असणारा मोबाईल व विहिरीत तरंगणारी बादली दिसल्यामुळे ही सर्व घटना उघडकीस आली आहे.. नवविवाहित पती – पत्नीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *