महत्वाच्या घडामोडी

एका चुकीमुळे संपलं सात वर्षापूर्वीचं नातं ! पती-पत्नीने सोबत सोडला जीव…

प्रतिनिधी / मुंबई

मुंबई येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर नॅशनल पार्क पुलावर काल एक धक्कादायक घटना घडली आहे.. या पुलावर एका डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवर असलेले पती-पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.. नाझीर शाह आणि छाया शाह असे या पती-पत्नीचे नाव आहे..

नाझीर शाह हे टीव्हीवरील रीएलिटी शोमध्ये क्रिएटिव्ही विभागात काम पाहतात.. तर छाया शाह या मेकअप आर्टिस्ट म्हणून कार्यरत होत्या.. नाझीर आणि छाया हे नायगाव येथे शुटिंगसाठी निघाले होते.. उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांच साम्राज्य पसरले आहे.. बोरिवलीहून दुचाकीवर दहिसरच्या दिशेने जात असताना नाझीर यांची दुचाकी एका खड्ड्यात पडली..

दुचाकी खड्ड्यात पडल्यामुळे नाझीर आणि त्यांची पत्नी छाया ही दोघं रस्त्यावर पडली.. त्याचवेळेस पाठीमागून येणाऱ्या डम्परने या दोघांनाही चिरडले आणि या अपघातात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल आहे.. नाझीर आणि छाया या दाम्पत्याला सहा वर्षाचा एक मुलगा आहे..

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नाझीर शाह यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या डम्परसह चालक सलीम शेख यालाही ताब्यात घेतले आहे.. या घटनेमुळे शाह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *