महत्वाच्या घडामोडी

पत्नीच्या मृत्युनंतर काही मिनिटातच पतीनं केलं असं काही…

प्रतिनिधी / इंदूर

मध्य प्रदेशातील इंदूरमधील परदेशीपुरा भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे.. येथे राहणाऱ्या एका महिलेने करवा चौथच्या दिवशी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.. गंभीर अवस्थेत तिच्या कुटुंबीयांनी तिला खासजी रुग्णालयात दाखल केले.. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे..

सोनू असे या महिलेचे नाव आहे.. सोनू हिने करवा चौथच्या दिवशीच विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.. सोनू हिचा मृत्यू झाल्याचे समजताच काही मिनिटातच तिचा पती शेखर यानेही विषारी द्रव्य प्राशन केले..

त्यानंतर पती शेखर याला एमवाय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.. परतू, त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.. पती आणि पत्नीने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही.. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *