क्राईम

भयंकर ! पत्नीला मारलं अन पोत्यात भरलं.. पुढे झालं असं काही…

प्रतिनिधी / राजस्थान

राजस्थानच्या अजमेरमध्ये एक मन हेलावणारी घटना घडली आहे.. येथे एका पतीने लग्नाच्या अवघ्या २६ व्या दिवशीच आपल्या पत्नीची निर्घुण हत्या केली आहे.. मुकेश केसवानी असे या हत्या केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.. आणि धक्कादायक बाब म्हणजे मुकेशचा प्रेमविवाह झाला होता..

मुकेश केसवानी याने जेनिफर नावाच्या तरुणीसोबत लग्न केले होते.. मात्र लग्नानंतर मुकेश आणि जेनिफर फार कमी वेळा घरातून बाहेर पडायचे.. तसेच हे दोघे कोणाशी जास्त बोलतही नव्हते.. एके दिवशी काही कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला..

घरातून मोठमोठ्याने भांडणाचा आवाज ऐकू येत होता.. अचानक काही वेळात आवाज येणं बंद झालं.. रोजचे भांडण असल्यामुळे शेजाऱ्यांनी फारसे लक्ष दिले नाही..काही वेळाने मुकेश घराबाहेर गेला आणि अर्ध्या तासाने परत घरी आला..

मुकेश काही वेळ गेल्यानंतर एक मोठं पोतं घेऊन घराबाहेर निघाला.. त्याच्या स्कूटीवर त्याने ते पोतं ठेवलं.. घाईघाईत ते पोतं खालून फाटलं आणि त्यातून जेनिफरचा हात बाहेर पडला.. आणि तिचे केसही दिसले..

मुकेश हे पोतं घेऊन पसार झाला.. शेजारच्यांनी हा प्रकार पाहताच त्यांच्या अंगावर काटा आला.. हा सर्व प्रकार शेजारच्यांनी पोलिसांना कळवला.. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समजले की, मुकेश आणि जेनिफर यांच्यात खूप मोठी भांडणं झाली होती..

जेनिफरने तिच्या आई – वडिलांना सगळं सांगण्याची धमकी दिली होती.. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि मुकेशने जेनिफरचा चाकूने भोकसून खून केला.. जेनिफरच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या आहेत..

मुकेशच्या आई – वडिलांना त्यांचे लग्न मान्य नव्हते म्हणून ते दोघे लग्नानंतर वेगळे राहत होते.. लग्नानंतर मुकेश हुंड्याची मागणी करून जेनिफरचा छळ करत होता.. अशी तक्रार जेनिफरच्या आईने केली आहे.. मुकेशला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, मुकेशनेही गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *