क्राईम

पत्नीचा खून करून मुलाला अडकवले ! अखेर तपासात पतीचे कृत्य उघडकीस आले…

प्रतिनिधी / पुणे

जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे एका महिलेचा खून करून पतीने त्या खुनात आपल्या मुलाला अडकवले आहे.. परंतु तपासानंतर खुनाचा मुख्य सूत्रधार हा मुलगा नसून त्या महिलेचा पतीच आहे असे उघडकीस आले आहे..

शिरोली तर्फे आळे या ठिकाणी तंबाखूला पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात मुलाने आईच्या डोक्यात खोरे घालून तिचा खून केल्याची तक्रार त्या महिलेच्या पतीने दिली होती.. बारकू सखाराम खिलारी ( वय – ६६ ) असे या पतीचे नाव असून अंजनाबाई बारकू खिलारी ( वय – ६० ) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे..

पोलिसांनी या खुनाची अधिक तपासणी केल्यानंतर पती बारकू यांनी दिलेल्या उत्तरात विसंगती आढळून आली.. आणि त्यांचा मुलगा अमोल हा मतिमंद असल्याचे दिसून आले.. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच फिर्यादी म्हणजेच महिलेचा पती बारकू सखाराम खिलारी हाच आरोपी असल्याचे सिद्ध झाले..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारकू यांच्यावर कर्ज झाले होते.. त्यांना शेतजमीन विकून दुसरीकडे स्थलांतरित व्हायचे होते.. या कारणावरून बारकू आणि त्यांची पत्नी अंजनाबाई यांच्यात सारखे वाद होत होते..

बारकू आणि त्यांच्या पत्नीमध्ये काल अशाच प्रकारे भांडण झाले आणि बारकू यांनी पत्नी अंजनाबाई यांच्या दिशेने विळा फेकून मारला.. तो विळा अंजनाबाई यांच्या तोंडाला लागला.. यानंतर त्या दोघांचे भांडण अधिकच तीव्र झाले.. या रागातूनच बारकू यांनी पत्नीच्या डोक्यात खोरे घालून तिला जीवे मारले..

बारकू यांना आपला मुलगा मतिमंद आहे हे माहित होते म्हणून पत्नीचा खून केल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला ” तू पोलिसांना मी सर्व काही केले आहे असे सांग ” बाकी मी सगळ सांभाळून घेतो असे म्हणत कपडे घालून बाहेर निघून जात मुलानेच खून केल्याचा बनाव केला..

पोलिसांनी मात्र अधिक तपास केल्यानंतर बारकू हाच खुनी आहे हे सिद्ध झाले.. बारकू याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *