महत्वाच्या घडामोडी

पत्नीने वाद केला म्हणून पतीने तिच्यासोबत केलं असं काही, पाहून तुम्हालाही धक्का बसेल…

प्रतिनिधी / कुपवाड

बामणोली येथील दत्तनगर भागात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे.. दत्तनगर भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा घरगुती वादातून पतीने डोक्यात बांबूने जोरदार हल्ला केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे.. सुनंदा कुमार जाधव ( वय – ३० ) असे या विवाहितेचे नाव आहे..

कुमार भीमराव जाधव ( वय – ३८ ) असे या पतीचे नाव असून कुमार हा दत्तनगर भागात गेल्या काही वर्षांपासून पत्नी आणि तीन मुली यांच्यासह भाड्याच्या घरात राहात आहे.. कुमार जाधव हा कुपवाड एमआयडीसीतील एका कारखान्यात हमालीचे काम करतो.. कुमार याचा विवाह पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे राहणाऱ्या मोहन जगदाळे यांची मुलगी सुनंदा हिच्याशी झाला होता..

काल रात्रीच्या सुमारास कुमार जाधव आणि त्यांची पत्नी सुनंदा यांच्यात ‘तू माहेरहून पैसे आण’ या घरगुती कारणावरून वाद झाला होता.. पत्नीने वाद घातल्याचा राग मनात असल्याने कुमार जाधव याने पत्नी सुनंदा हिला फरफटत घराबाहेर आणले व अंगणात आणून बांबूने डोक्यात जोरदार हल्ला केला.. या हल्ल्यात सुनंदा रक्ताच्या थारोळ्यात पडली.. हे पाहून कुमार घाबरला आणि त्याने शेजारच्या रिक्षा चालकाला बोलावून पत्नी सुनंदा हिला उपचारासाठी सांगलीतील सिव्हील रुग्णालयात दाखल केले..

मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सुनंदा हीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.. हे ऐकून पती कुमार याने रुग्णालयातून पळ काढला.. या घटनेची माहिती डॉक्टरांनी कुपवाड एमआयडीसी पोलिसांना दिली.. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कुमार जाधव यांचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले आहे.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *