महत्वाच्या घडामोडी

दारूच्या नशेत पतीने पत्नीसोबत केलं असं काही , मन सुन्न करणारी घटना…

प्रतिनिधी / नवापूर

घरगुती वादातून एका पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून खून केल्याची दुर्दैवी घटना देवमोगरा येथे घडली आहे.. टीना अविनाश पाडवी ( वय – ३३ ) असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.. या महिलेचा पती अविनाश जेना पाडवी ( वय – ४० ) याने घरगुती भांडणावरून पत्नी टीना हिचा गळा आवळून तिच्या पाठीवर, चेहऱ्यावर आणि दोन्ही पायांवर मारहाण करून तिला जीवे मारले आहे.. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठवण्यात आला आहे.. या घटने प्रकरणी संशयित आरोपी अविनाश पाडवी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *