महत्वाच्या घडामोडी

रस्त्याच्या कडेला बसून नवरा घेतोय बायकोची अशी काळजी ! पाहा हा भावनिक व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

आपण पाहतो की नवरा – बायको एकमेकांशी खूप भांडतात.. पण एकमेकांवर प्रेमही तितकेच करत असतात.. एकमेकांना साथ देणारे नवरा – बायको एकमेकांची काळजीही तितकीच घेत असतात.. कधी एखाद्याला जर बरे नसेल तर डॉक्टरकडे नेण्यापासून ते खाऊ घालण्यापर्यंत अनेक गोष्टी हे दोघे करत असतात..

सध्या सोशल मिडीयावर नवरा – बायकोचे प्रेम दाखवणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.. या व्हिडीओमध्ये नवरा आपल्या बायकोची अतिशय प्रेमाने काळजी घेताना दिसत आहे.. ह्या व्हिडीओमधील नवरा – बायको एका बस स्टेन्डवर बसले आहेत..

बसलेल्या नवऱ्याच्या मांडीवर पत्नी झोपली असून तो आपल्या पत्नीला अतिशय प्रेमाने थोपटत आहे.. तोंडावर प्रकाश येऊ नये म्हणून या महिलेने तोंडावर पांघरून ओढून घेतले आहे त्यामुळे तिचा चेहरा दिसत नाही..

बायकोचा हात तिच्या डोक्याखाली अवघडेल म्हणून नवरा तिचा हात डोक्याखालून काढून बाजूला ठेवतो.. बराच वेळ मांडी घालून बसल्यामुळे नवऱ्याचे पाय कदाचित अवघडले असतील.. परंतु आपल्या बायकोची झोपमोड होऊ नये म्हणून तो तसाच मांडी घालून बराचवेळ बसून राहतो..

कठीण परिस्थितीमध्येही एकमेकांवरचे प्रेम यातून दिसून येते.. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.. आणि बऱ्याच जणांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *