महत्वाच्या घडामोडी

दुर्दैवी ! मेहुणीच्या साक्षगंधाहून परतताना पती – पत्नीवर काळाचा घाला…

प्रतिनिधी / परतवाडा

परतवाडा शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे.. अवघ्या अडीच वर्षापूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याचा मोर्शी – रिद्धपूर – शिरखेड येथे अपघात झाला आहे.. यात पती – पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.. छोटू ऊर्फ पीयूष दिगंबर वाठोडकर ( वय – ३० ) आणि प्रतीक्षा पीयूष वाठोडकर ( वय – २५ ) असे या मृत पती – पत्नीची नावे आहेत..

पीयूष हे परतवाडा शहरालगत देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बालाजीनगर येथील रहिवासी आहेत.. त्यांच्यासोबत त्यांचा श्रीयंश हा एक वर्षाचा मुलगाही होता.. या अपघातात मुलगा बचावला आहे..

पीयूष हे पत्नी आणि आपल्या लहान मुलासह निंभी या पत्नी प्रतीक्षा हिच्या माहेरी कार्यक्रमासाठी मित्राच्या दुचाकीवरून गेले होते.. तेथे त्यांनी सर्व नातेवाईकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि कार्यक्रम संपल्यानंतर पीयूष हे तिथून घरी जाण्यासाठी निघाले..

घरी परतत असताना पीयूष यांच्या दुचाकीला मधेच एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली.. या अपघातात पीयूष आणि त्यांची पत्नी प्रतीक्षा हे जागीच ठार झाले.. तर एक वर्षाचा चिमुकला हा बचावला असून त्याच्यावर अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत..

या घटनेनंतर पीयूष आणि प्रतीक्षा यांचे मृतदेह अमरावती येथे रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.. पीयूष आणि प्रतीक्षा यांच्या अकस्मात मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

पीयूष आणि प्रतीक्षा यांनी काही दिवसापूर्वीच आपल्या एकुलत्या एक मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.. सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *