महत्वाच्या घडामोडी

इन्स्पेक्टर पती आपल्या पत्नीसोबत कार मधून जात असताना घडले असे काही…

प्रतिनिधी / कर्नाटक

कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला भरधाव कारने मागून जोरात धडक दिली आहे.. ही धडक इतकी भयंकर होती की कार कंटेनरच्या मागच्या बाजूत घुसली आणि या धडकेत पती – पत्नीला जबर मार बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे..

सिंदगी येथील सर्कल इन्स्पेक्टर रवी उकुंडा ( वय – ४३ ) आणि त्यांची पत्नी मधु उकुंडा ( वय – ४० ) असे मृत झालेल्या पती – पत्नीचे नाव आहे.. स्टेशनरीचे सामान घेऊन जाणारा कंटेनर रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूला हायवेवर पार्क होता..

रवी हे आपल्या पत्नीसोबत स्विफ्ट डिझायर कारमधून जात होते.. त्यावेळी समोर असलेला कंटेनर रस्त्याच्या कडेला पार्क केलेला आहे, याचा अंदाज रवी यांना आला नाही.. रवी यांचं कारवरच नियंत्रण सुटल आणि त्यांनी भरधाव वेगाने कंटेनरला मागून जोरात धडक दिली..

या अपघातात रवी यांची कार कंटेनरच्या मागच्या भागात पेचूत अडकली गेली.. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पती – पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.. या अपघातात मृत झालेल्या कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील असलेले रवी उकुंडा हे कलबुर्गीच्या सिंदगी येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते..

सहा वर्षात पोलीस दलात असलेल्या अनेक जबाबदाऱ्या रवी यांनी पार पाडल्या होत्या.. अल्पावधीतच लोकाभिमुख अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले..

पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.. या दुर्दैवी घटनेनंतर कर्नाटक जिल्ह्यातील कोप्पल आणि कलबुर्गी येथील पोलीस सहकाऱ्यांनी एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूमुळे दुःख व्यक्त केले आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *