महत्वाच्या घडामोडी

गरिबीमुळे पतीनं केलं असं काही, पाहून तुम्हालाही धक्का बसेल…

प्रतिनिधी / भंडारा

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही सीतासावंगी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे राहणाऱ्या एका पतीने आर्थिक तंगीतून पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून केला आणि नंतर स्वतःचा ब्लेडने गळा चिरून आत्महत्या केली आहे..

सरिता सुशील बोरकर ( वय – ३७ ) असे पत्नीचे नाव असून सुशील नीलकंठ बोरकर ( वय – ४५ ) असे पतीचे नाव आहे.. सुशील हा अंडी विक्रीचा व्यवसाय करत होता.. आणि सरिता ही आशा सेविका म्हणून आरोग्य विभागात काम करत होती..

काही दिवसांपासून सुशीलला आर्थिक चिंता सतावित होती.. काल रात्री सुशील आणि सरिता एका खोलीत झोपली आणि दोन मुले दुसऱ्या खोलीत झोपली होती.. सकाळी मुले शाळेत जाण्यासाठी निघाली असता, आई दरवाजा उघडत नसल्यामुळे शेजारी राहात असलेल्या काकांना मुलांनी आवाज दिला..

काकांनी मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला.. त्यानंतर समोर सुशील आणि सरिता या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.. तपास सुरु असताना खोलीत एक ब्लेड आढळून आले.. या ब्लेडने सुशीलने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून करून त्याच ब्लेडने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.. या घटनेने सुशील आणि सरिता यांची दोन मुले पोरकी झाली असून, परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *