महत्वाच्या घडामोडी

पत्नीचा मृतदेह पाहून तिथेच पतीनेही संपवले जीवन…

प्रतिनिधी / नाशिक

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे एका महिलेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचं काम सुरु होतं.. एव्हड्यात आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीनेही विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे.. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे..

रुपाली प्रकाश याळिज आणि प्रकाश शंकर याळिज असे या आत्महत्या केलेल्या दाम्पत्यांची नावे आहेत.. रुपाली याळिज यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मानसोपचार तज्ञांकडे उपचार सुरु होते.. असे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे.. ‘पत्नीशिवाय आता मी जागून काय करणार ? या चिंतेत असताना पतीनेही त्याच वेळी टोकाचं पाऊल उचललं.. मागचा पुढचा विचार न करता प्रकाश यांना आपल्या पत्नीचा विरह सहन न झाल्याने त्यांनीही आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.. या दाम्पत्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुलं देखील आहेत.. या दोन मुलांच्या डोकयावरचं आई – वडिलांचं छत्र हरपलं आहे.. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *