महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी शेवट…

प्रतिनिधी / पंजाब

अमेरिकेलीत कॅलिफोर्नियात तीन दिवसांपूर्वी एका भारतवंशिय कुटुंबाचे अपहरण झाले होते.. हे अपहरण झालेला कुटुंब पंजाबमधील होशियार पूर जिल्ह्यातील टांडा येथील हरसी गावातील रहिवासी आहेत.. या अपहरण केलेल्या व्यक्तींमध्ये जसदीप सिंग(वय – ३६ ) त्यांची पत्नी जसलीन कौर, त्यांची ८ महिन्याची मुलगी आरुही धेरी आणि ३९ वर्षाचे एक व्यक्ती अमनदीप सिंह या चौघांचा समावेश आहे..

या अपहरणानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे..कॅलिफोर्नियाच्या पोलिसांना जी भीती वाटत होती तेच घडलं.. अगोदर अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर या चौघांची हत्या करण्यात आली आहे.. याच भागात चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत.. चौघांचेही मृतदेह जवळ जवळ असल्याचे एका शेतकऱ्याने पाहिले आणि याची माहिती पोलिसांना दिली.. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.. या अपहरण आणि हत्याकांडांमागे नेमका काय उद्देश आहे हे अद्याप समजू शकले नाही.. कारण अपहरणकर्त्यांनी कोणालाही खंडणी मागितली नाही.. मात्र या अपहरणामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा शेवट झाला आहे.. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *