महत्वाच्या घडामोडी

आश्चर्यकारक ! बाई प्रवेश करताय की फुटबॉल खेळताय ? पाहा नवरीचा व्हायरल व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

लग्न झाल्यावर नवरी जेव्हा तिच्या सासरच्या घरी येते तेव्हा सासरच्या घराच्या उंबरठ्यावर तांदळाने भरलेला कलश किवा माप ठेवले जाते.. नवरीने हे तांदळाने भरलेला कलश किवा माप अगदी अलगदपणे ओलांडून मगच गृहप्रवेश करायचा असतो.. अशी आपल्याकडे प्रथा आहे..

सध्या सोशल मिडीयावर माप ओलांडताना एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. हे जोडपे दक्षिण भारतीय असल्याचा अंदाज येतो.. नवरा – नवरी अगदी साध्या वेशभूषेत आहेत.. मात्र लग्न झाल्यावर दोघेही घराच्या उंबरठ्याजवळ आले..

त्यावेळी गुरुजींनी मंत्र म्हटले आणि नवरीच्या पुढे ठेवलेला कलश ओलांडून आत येण्याची सूचना दिली.. हे ऐकून नवरीने तिचा उजवा पाय पुढे करून तांदळाच्या कलशाला असा काही जोरात पाय मारला की, तो कलश पार कुठच्या कुठ जाऊन पडला..

तिचं हे कृत्य पाहून नाव्रीही कावरी – बावरी झाली आहे आणि नवरदेव तर पुरता गोंधळून गेला आहे.. आपल्या बायकोला काय बोलावे, हसावे की रडावे हेच नवरदेवाला समजत नव्हते.. हा व्हिडीओ पाहून सर्वांना हसू आवरले नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *