महत्वाच्या घडामोडी

धाडस बेतलं जीवावर ! पुराच्या पाण्यात आजोबा आणि नातू गेले वाहून…

प्रतिनिधी / अकोला

अकोला येथे मोहाळी नदीवरील पूल ओलांडताना आजोबा आणि नातू दोघेही नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. या घटनेत आजोबांचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह हाती लागला आहे.. तर नातवाचा शोध सुरु आहे.. प्रभाकर प्रल्हाद लावणे ( वय – ६२ ) असे आजोबांचे नाव आहे आणि आदित्य विनोद लावणे ( वय – ११ ) असे नातवाचे नाव आहे.. हे दोघेही तांदुळवाडी येथे राहतात..

आजोबा आणि नातू हे दोघे जण आज म्हैस घेवून सोनबर्डी गावात गेले होते.. माघारी परतत असताना दोघेही मोहाळी नदीवरील पूल ओलांडत होते.. यावेळी नातू आदित्य हा पूल ओलांडताना नदीच्या प्रवाहात वाहून गेला, हे आजोबांच्या लक्ष्यात येताच त्याला वाचवण्यासाठी आजोबांनी प्रयत्न केले.. मात्र, ते दोघेही नदीच्या प्रवाहात वाहून गेले..

तांदुळवाडी गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोघांनाही शोधण्यास सुरवात केली.. यावेळी आजोबा प्रभाकर लावणे यांचा मृतदेह त्यांच्या हाती लागला.. परंतु नातू आदित्य हा अजूनही बेपत्ता आहे.. प्रभाकर लावणे यांना एकुलता एक मुलगा असून त्यांच्या मुलालाही आदित्य हा ऐकटाच मुलगा होता.. या घटनेने लावणे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *