महत्वाच्या घडामोडी

भावंडं घरी जाताना घडलं असं काही, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल…

प्रतिनिधी / वाशिम

वाशिममधील पुसद मार्गावरील रेल्वे पुलावर काल दसऱ्याच्या दिवशी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.. दिवसभर फुलं विकून घरी जाताना एका भाऊबहिणीवर काळाने घाला घातला आहे..यामध्ये बहिणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. ज्योती महादेव बनसोडे असे या बहिणेचे नाव आहे..

ज्योती हिच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.. ज्योतीला आणखी एक भाऊ आणि बहिण आहे.. ज्योतीचे वडील मजुरी करतात तर आई भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करते.. ज्योतीच्या आईने दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुले विकण्यासाठी गाडा लावला होता.. ज्योतीला त्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्याने ज्योती आणि तिचा लहान भाऊ फुले विकण्यासाठी थांबले होते..

फुले विकून झाल्यानंतर ज्योती आणि तिच्या भावाने गाडा लावून दिला आणि पार्वती देवीची मूर्ती विकत घेऊन ते घराकडे निघाले.. त्याचवेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला.. घर जवळ असल्याने आडोशाला न थांबता त्यांनी वेगाने घराकडे जाण्याचे ठरवले.. रेल्वेच्या पुलावरून जात असताना अचानक एक मोठ्ठा आवाज झाला आणि ज्योतीच्या डाव्या बाजूला वीज कोसळली.. आणि तिचा जागीच मृत्यू झाला.. क्षणात होत्याचे नव्हते झाले.. ज्योतीचा लहान भाऊ हाही गंभीर जखमी झाला आहे.. ज्योतीच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *